top of page
whatsapp-logo-1-1.png

चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे 67.47 टक्के मतदान

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातून अंदाजे 67.47 टक्के मतदान करण्यात आले. आज सकाळी 8 वाजेपासूनच मतदारांनी जिल्ह्यातील 50 मतदान केंद्रावर सर्वत्र उत्साहात व शांततेने मतदान केले.

जिल्ह्यात 22 हजार 33 पुरूष, 10 हजार 723 स्त्री व इतर 5 असे 32 हजार 761 पदवीधर मतदार होते. त्यापैकी अंदाजे 15 हजार 658 पुरूष, 6 हजार 444 स्त्री व इतर 1 अशा एकूण 22 हजार 103 एकूण मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कुल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देवून पाहणी केली. तसेच अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजोरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केद्रावर भेट देवून पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेटी देवून निवडणूक प्रक्रीयेची पाहणी केली.

मतदान केंद्रावर सामाजिक दुरीतेचे पालन करण्यात आले. प्रत्येक मतदार रांगेत रेखांकित केलेल्या वर्तुळात उभे होते. हॅन्ड सॅनिटराईज केल्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतदारांना प्रवेश नव्हता. मतदानापूर्वी थर्मल स्क्रिनींग, ऑक्सिमीटरद्वारे मतदारांची तपासणी करण्यात येत होती. शिवाय मतदान केंद्रावर प्रथमोपचाराची सुविधा देखील उपलब्ध होती. मतदारांचे तापमान, हँड सँनिटाईज, तसेच ऑक्सिमीटरने ऑक्सिजनचे प्रमाणही तपासण्यात येत होते, येथे मतदाराच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करत काळजी घेतली. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन मतदान अधिकारी व एक पीठासीन अधिकारी अशी चमू कार्यरत होती.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 7.77 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 18.94 टक्के, दुपारी 2 वाजेपर्यंत 36.89 टक्के, 4 वाजेपर्यंत 54.16 टकके तर 5 वाजेपर्यंत अंदाजे 67.47 टक्के मतदान झाले.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page