top of page
whatsapp-logo-1-1.png

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डी. एन .गायकवाड यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. रविवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे ते संचालक होते. बक्षीहिप्परगे गावचे २० वर्षे त्यांनी सरपंच पद भूषवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बक्षीहिप्परगे येथे राज्यस्तरीय परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन ते करत होते. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांनी शाहू, फुले,‌ आंबेडकर लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, वडील असा परिवार आहे.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page