
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

जालना : अहमदनगर येथे झालेल्या राज्य शूटिंग बॉल स्पर्धेत भोकरदन येथील मराठवाडा रेडिअंट इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षीय मुला मुलींच्या संघाने जालना जिल्ह्याकडून सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये दोन्ही संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करून राज्यात प्रत्येकी ४ थ्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळवला. तसेच त्यांच्या चांगल्या खेळीसाठी अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निनाद देशपांडे, पल्लवी गिरणारे दोन विद्यार्थ्यांंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अविनाश गाढे, क्रिडा शिक्षक सुरेश भोसले, शिला गाढे, गणेश दळवी, मोहित जैस्वाल, नारायण पडोळ यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, जि. प. सदस्य आशा पांडे, राज्य शूटिंग बॉलचे उपाध्यक्ष मुकेश चीने, प्राचार्य डॉ.भगवान डोंगरे, डॉ. एस. एस. गोरे यांनी अभिनंदन केले.








