
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा महानगरतर्फे मंडळ क्रमांक ४ येथे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यात दोनशेहून अधिक महिला व युवकांनी सहभाग नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत २० कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या माध्यमातून शेती व शेती पूरक व्यवसाय, लघू उद्योग, महिला व युवा उद्योजकांसाठी विशेषतः आर्टजीक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला घेता यावा व आत्मनिर्भर योजनेबद्दल अधिक माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत मिळावी याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र या उपक्रमांतर्गत हे शिबिर घेण्यात आले. यात दोनशेहून अधिक महिलांना व अनेक युवकांना कोणत्या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्याकरिता काय करावे लागेल याबद्दल आत्मनिर्भर जिल्हा संयोजक महेश राठी यांनी मार्गदर्शन केले.
आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, यांच्या नेतृत्वाखाली व आत्मनिर्भर केंद्र प्रदेश संयोजक हर्षल विभांडीक, विभागीय प्रदेश संयोजक विजय बनछोडे, किरण बोराडे यांच्या सूचनेनुसार प्रभागनिहाय हे शिबिर घेण्यात येणार आहे. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








