
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान


सांगोला : सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन अविरतपणे काम करणाऱ्या कडेगावच्या धडाडीच्या युवा सामाजिक कार्यकर्त्यां काजल हवलदार यांना श्रीम फौंडेशन व सी बी एस न्युज यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. श्रीम फौंडेशनच्या चेअरमन राजश्री गायकवाड, सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते काजल हवलदार यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, तसेच सी बी एस न्युजचे मुख्य संपादक चांदभैय्या शेख आदी उपस्थित होते.
सामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, महीला तसेच विद्यार्थीवर्गासाठी अनेक सामाजिक उपक्रम काजल यांनी गेली 5 ते 6 वर्षे राबविले आहेत. यामध्ये गरजुंना धान्य वाटप, फुटपाथवरील लोकांना अन्नदान, रक्तदान शिबीर, अनाथ व बेघर लोकांना मदत, स्त्रियांसाठी तसेच विद्यार्थीसाठी समाज उपयोगी उपक्रम, लेक शिकवा लेक वाचवा अभियान, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, सामाजिक वाढदिवस, विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यशाळा असे समाज उपयोगी उपक्रम काजल यांनी सातत्याने राबविले आहेत. त्यांचा या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून झाला आहे.
तसेच त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातील काही गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व शैक्षणिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे काम सेवाभावी वृत्तीने केले आहे. त्यांच्या यासर्व कार्याची दखल घेत आणि त्याची पोचपावती म्हणुनच काजल हवलदार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.








