
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

सोलापूर : भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारीत ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, केंद्र समन्वयक विवेकानंद जगदाळे, विलास लंगोटे, आगळगांव केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी जाधवर, प्रभारी केंद्र प्रमुख गवारे व मुख्याध्यापक सुधीर घाडगे यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले. शाळेतील नोडल शिक्षक संतोष उकिरडे यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा केंद्रामध्ये दुसरी केली.








