
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड : जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020-21 साठी नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, कंधार, लोहा याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रती क्विंटल 6 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक प्रत आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.








