
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान


धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. या मतदानासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या मतदान केंद्रांवर त्या- त्या तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात मतदान केंद्र असणार आहे. त्यात तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, तहसील कार्यालय, साक्री, तहसील कार्यालय, शिंदखेडा, तहसील कार्यालय, शिरपूर (नवीन इमारत) जि. धुळे, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, तहसील कार्यालय, नवापूर, तहसील कार्यालय, शहादा, तहसील कार्यालय, अक्राणी, तहसील कार्यालय, तळोदा, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ज्या तालुक्यातील संबंधित मतदार विजयी झाले असतील त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर संबंधित मतदारांनी मतदान करावयाचे आहे, याची संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.








