
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2020- 2021 या वर्षासाठी तसेच 2019- 2020 चे त्रुटीयुक्त अर्ज पुन्हा (Re-Apply) सादर करणे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मागे पाठविलेले अर्ज (Sent Back To Applicant) अर्ज महाडीबीटीप्रणालीवर सादर करण्याकामी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी ही संगणक प्रणाली 3 डिसेंबर 2020 पासून कार्यान्वित झालेली आहे.
संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज तत्काळ भरावेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पडताळणी करुन या कार्यालयास विहित वेळेत ऑनलाईन सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.








