
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान पुरस्काराची घोषणा; रविवारी होणार पुरस्काराचे वितरण


सोलापूर : स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, महाराष्ट्र राज्य स्नेहबंध वाचनालय, स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान पुरस्काराची घोषणा संस्थेचे संस्थापक कृष्णा गायकवाड व पंढरीनाथ कदम यांनी केली. या पुरस्काराचे वितरण युवा नेते भगीरथ भालके, गणेश पाटील, उद्योगपती अभिजित पाटील आदींच्या उपस्थितीत रविवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे..
समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदाचे हे संस्थेचे दुसरे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी राज्यभरातील विविध क्षेत्रातील ३५ गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात वग सम्राट शाहीर वामनराव पाटोळे पंढरपूर, युवा नेते रमेश बारसकर मोहोळ, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक पत्रकार भरतकुमार मोरे, (सोलापूर) सीमा पाटील( नागपूर) ,पुष्पांजली मराठे( पुणे,) यांच्यासह मारुती दिगंबर भोसले (पंढरपूर) .भारत चव्हाण (कोल्हापूर) , साहेबराव चंदनशिवे (सांगली), तुकाराम देठे (शहापूर), धनाजी अण्णा देशमुख (भोसे,पंढरपूर). गणेश गायकवाड (आंबे,पंढरपर), हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन, सिल्लोड (औरंगाबाद), आकाशनंद हिरवे,(मुंबई) सुशील जानराव (सोलापूर), जयोस्तुते फाउंडेशन ( सोलापूर) सावता जाधव (फुलचिंचोली), .डॉ.सुप्रिया श्रीप्रसाद कदम (सांगली). तिपन्ना कमळे मोहोळ, सीताराम लाला खरात (पुणे) अभिजित कांबळी (मुबई) प्रणाली प्रशांत कांबळे (ठाणे), प्रणाली कांबळे (ठाणे) , एकनाथ नेत्रे महाराज (पंढरपूर), दत्तात्रय खपाले (पांढरेवाडी,) राधिका बालाजी लोढे, संगीता मेटकरी (आटपाडी ), श्रीराम महाजन ( मुंबई), ऍड.भगवान मुळे (पंढरपूर), नरीमन लेन उर्दू शाळा (कुर्ला,मुंबई), न्यू माणदेशी फाउंडेशन, विशाल रमेश परमार (मुंबई) प्रियांका पवार,(नवी मुंबई), निर्मला पाटील (भिवंडी) , दत्तात्रय फाळके, दत्तात्रय पांढरे(पंढरपूर,) डॉ आबासाहेब रणदिवे, दिनेश रिकामे (ठाणे), मनोहर राठोड (यवतमाळ), पुष्पाताई सरगर (सांगली), ऍड.तुषाल शिवशरण (सांगली), सुहास सुतार (वैराग), पंजाबराव तळेकर (पुणे), ऍड.बादल यादव (पंढरपूर), द वॉटर फाउंडेशन (ठाणे ), रोहिणी संजय सुरवसे ( सांगोला), नेहा कदम( मुंबई ), भगवती जाधव (सोलापूर), विकास थोरात(ठाणे), डॉ.भूमिका बेरगळ साहेबराव लोखंडे ( मुंबई ), सुनील होरंबे (मुंबई), संगीता गुरव (बदलापूर), जयश्री (माई ) सावर्डेकर (नवी मुंबई ) यांचा सन्मान होणार आहे.








