
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
वाढदिवसाचा खर्च टाळून "बाबा आमटे सामाजिक विकास संस्थे"ला 21 हजार रुपयांची मदत


श्रीगोंदा : अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे.वाढदिवस म्हटला की बँनरबाजी, मोठमोठ्या सभामंडप, हारतूरे, मोठमोठे होल्डींग यामुळे होणारा प्रचंड खर्च असे स्वरूप असते, परंतू ह्या गोष्टींना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त हेतुने मढेवडगाव येथील युवक कार्यकर्ते संदीप विश्वनाथ मांडे यांनी आपल्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रींच्या हस्ते "बाबा आमटे सामाजिक विकास संस्थे"चे अनंत झेंडे यांच्याकडे रोख स्वरूपात २१ हजार रुपयांची मदत दिली.
श्रीगोंदा येथील अनंत झेंडे हे आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून "बाबा आमटे सामाजिक विकास संस्थे"च्या माध्यमातून काम करत आहेत. त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन सध्या नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक असणारे संध्या/गणेश मोहन सुद्रीक (रा. बारडगाव सुद्रीक, ता.कर्जत) या दापत्याने आपली मुलगी माही हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून "बाबा आमटे संस्था"च्या कॉम्प्युटर रूमच्या फर्निचरसाठी एकवीस हजार रुपयांची मदत केली आहे.








