top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 8 June 2026
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या


अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.. या घटनेनंतर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
रेखा जरे या सोमवारी (30 नोव्हेंबर) आपला मुलगा आणि आईसोबत पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती.


bottom of page






