
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Thursday, 22 October 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
भवानी चौक वाडी बु ते लिंबगावचा रस्ता सकाळी 6 ते 9 यावेळेत जडवाहनास प्रतिबंध


नांदेड : भवानी चौक (निळा जंक्शन) वाडी बु. नांदेड पासून ते लिंबगाव पर्यंतचा रस्ता 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत सकाळी 6 ते 9 यावेळेत सायकलींगसाठी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवासी वाहने, शासकिय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टिने सायकलींगसाठी हा रस्ता 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 या 29 दिवसासाठी सकाळी 6 ते 9 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने व शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंधीत केला आहे. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने (एलएमव्ही) वगळता उर्वरित सर्व जडवाहनास पुर्णपणे प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रतिबंधीत करण्यात आलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग लिंबगाव-नाळेश्वर-वाघी-नांदेड असा राहिल. या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.








