top of page
whatsapp-logo-1-1.png

नांदेड : 25 कोरोना बाधितांची भर

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

नांदेड : सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 25 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या 518 अहवालापैकी 490 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 866 एवढी झाली असून यातील 20 हजार 733 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 354 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 4 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड तालुक्यात 1,माहूर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, पूर्णा तालुक्यात 1 असे एकुण 17 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, कंधार तालुक्यात 1, लोहा 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकुण 8 बाधित आढळले.

जिल्ह्यात 354 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 26, मुखेड कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 17, देगलूर कोविड रुग्णालय 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 145, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 60, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 34 आहेत.

सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 62 एवढी आहे.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page