top of page
whatsapp-logo-1-1.png

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; ही ९ कागदपत्रे ग्राह्य

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

नांदेड : निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० साठी मतदारांना सुकर मतदान करता यावे यासाठी पुढील ९ कागदपत्रे मतदाराची ओळख म्हणून पटविण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. यात १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) पारपत्र (पासपोर्ट) ५) केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक संस्थेने वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) मा. खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाने वितर‍ित केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीतील पात्र उमेदवारांना या ९ पुराव्यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल. सर्व पदवीधर मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page