
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
एम.के.फाऊंडेशने निराधारांना दिली मायेची उब; पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप


सोलापूर : चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते,परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते.समाजातील अशाच काही वंचीत,भीक मागून खाणारे मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधव यांना जात,धर्म,भाषा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने एम. के.फाऊंडेशने थंडीपासून बचाव व्हावी म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे.
पार्क चौक येथील व्यापारी गाळ्यांसमोरील,सिद्धेश्वर मंदिर,रेल्वे स्टेशन,होम मैदान परिसरात वास्तव्यास असणाऱ्या बेघर गरजूंना ब्लॅंकेट वाटप करून एम.के.फाऊंडेशने मदतीचा हात दिला. पहाटे ४ च्या सुमारास थंडीत कुडकूडणाऱ्या निराधाराना अचानक अडचणीच्यावेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी एम.के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे,उद्योजक आनंद लोणावत,शिवा ट्रेडर्सचे सोमनाथ होसाळे,फाऊंडेशनचे संचालक शिवाजी राठोड, नीलकंठय्या स्वामी,नागेंद्र कोगनुरे,अजित पाटील, सागर मादगुंडी,मल्लिकार्जुन दारफळे, महांतेश बगले, मल्लिकार्जुन बगले, श्रीशैल हिप्परगी,किशोर कोळगे आदी उपस्थित होते.








