top of page
whatsapp-logo-1-1.png

राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मुंबई : राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच दि. 5, 6, 12 आणि 13 डिसेंबर 2020 या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीमदेखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात दि. 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून प्रारुप मतदार यादीतील नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी संबंधित बाबीसाठीच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

सर्व राज्यभरात या पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत शनिवार दि. 5 डिसेंबर तसेच रविवार दि. 6, शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर, 2020 रोजी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्याच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची आणि यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचाही उपयोग करावा. अधिक माहितीसाठी wwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page