
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
12 डिसेंबर ला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

वर्धा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालय येथे 12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे , 138 एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भु संपादन प्रकरणे, कौटूंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी सबंधित प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षाच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी न्यायालयात सादर करावी. सदर प्रकरणे न्यायालयात मोठया प्रमाणात ठेवून आपसी तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा यांनी केले आहे.
जिल्हयातील जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा(घा) सेलू व समुद्रपूर या न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळणार असून दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या आपसी सहमतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेल्या न्यायनिवाडण्याचे व तडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. असे परमा यांनी सांगितले.








