
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, (जिमाका) दि. 20 - एकात्मिक बाल विकास सेवा योजना जळगाव अतंर्गत अंगणवाडी सेविकांची दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहे. जळगाव खुर्द (1) व भादली खुर्द (1) येथील रिक्त पदे भरण्याकरीता उत्सुक महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका पदासाठी शिक्षण 10 वी उत्तीर्ण असावे, उमेदवार त्याच गावातील स्थानिक रहिवाशी असावा. अर्ज घेतांना ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला आणणे अत्यावश्यक राहिल. ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखल्याशिवाय अर्ज मिळणार नाही. अंगणवाडी सेविका पदावर सरळ नियुक्तीसाठी दिनांक 1 फेब्रुवारी, 2021 रोजी वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष असावे.
अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव कोबडी बाजार, राजकमल टॉकीजजवळ, जळगाव या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून 22 जानेवारी, ते 5 फेब्रुवारी, 2021 पर्यत रुपये 5/- नाममात्र किंमतीत मिळेल. अर्ज 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी, 2021 पर्यंत कार्यालयात झेरॉक्स कागदपत्रांसह समक्ष सादर करावा. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








