top of page
whatsapp-logo-1-1.png

1 फेब्रुवारीपासून हेल्मेट अनिवार्य

Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करने अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2021 पासून करण्यात येणार असून हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील व त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होणेकरीता दरवर्षी संपुर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सोबत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवाडा साजरा करण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे आहे. तसेच वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे.

तसेच जिल्ह्यातील इतर सर्व खाजगी क्षेत्रातील आस्थापना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, एम.आय.डी.सी., शाळा, महाविद्यालय व कंपन्या यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरासंबंधी प्रवृत्त करावे व यासाठी व्यवस्थापकीय स्तरावर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना विनंती केली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

rt__1609.jpg
Mahanews.jpg
Mahanews.jpg

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....

Mahanews.jpg
Mahanews.jpg

सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

Mahanews.jpg
Mahanews.jpg

डी. एन‌. गायकवाड यांचे निधन

Mahanews.jpg
Mahanews.jpg

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषदेची बेलगाव शाळा आगळगाव केंद्रात दुसरी

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भोकरदनच्या निनाद देशपांडे व पल्लवी गिरणारेची महाराष्ट्र संघात निवड

Mahanews.jpg
Mahanews.jpg

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

Mahanews.jpg
Mahanews.jpg

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

Mahanews.jpg
Mahanews.jpg

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी

classi 1.jpg
Higlaj Gruhudyog New.jpg
bottom of page