top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
राजनगट्टा येथे फिट इंडिया मोहीमेंतर्गत जनजागृती


नेहरू युवा केंद्र,गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा,ता.चामोर्शी च्या वतीने राजनगट्टा येथे फिट इंडिया मोहीमेंतर्गत प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभात फेरी काढून घोषवाक्य व प्रबोधनाच्या माध्यमातून गावातील युवक, वृद्ध व सर्व गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये शारीरिक कसरत किती महत्वाची आहे हे सांगण्यात आले. तसेच विविध खेळाविषयी माहिती, त्यासाठी लागणारी पात्रता, शिक्षणाच्या माध्यमातून मिळणारी सवलत, तसेच रोजच्या जीवनात आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती मंडळाचे सचिव अनुप कोहळे यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश भांडेकर, सचिव अनुप कोहळे व इतर पदाधिकारी आणि समस्त गावकरी उपस्थित होते.


bottom of page






