
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
वडिलांच्या स्मरणार्थ दिनेश गायकवाड यांनी शाळेच्या बांधकामासाठी दिली १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी


श्रीगोंदा : रूढी परंपरांच्या नावाखाली वारेमाप खर्च करणं, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कार्यक्रमासाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. हे श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील दिनेश (अंबादास ) गायकवाड यांनी २६ जानेवारीचे औचित्य साधून वडील कै.नारायण डोमाजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेस शाळेच्या बांधकामासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देऊन दाखवून दिले.
संतोष नारायण गायकवाड,आदित्य संतोष गायकवाड व विद्या संतोष गायकवाड यांनी मुख्याध्यापक नवनाथ बोडखे यांच्याकडे रोख स्वरूपात १ लाख ११ हजार १११ रुपयांची रक्कम प्रदान केली. दिनेश गायकवाड यांनी दातृत्वाचा कित्ता गिरविला असून, त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये एल.इ.डी,खुर्च्या,पाणी टाकी, टेबल आदी वस्तुंचे वाटप शाळांमध्ये जाऊन केले. मढेवडगांव येथील दिनेश गायकवाड यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले असुन त्यांचे गावातील या शाळेवर त्यांच्या मनात मोठी आस्था,प्रेम होते. शिक्षणामुळे जीवनात माणूस काहीही करू शकतो या विचारातून अन् गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या कळवळीतून त्यांनी शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी रोख स्वरूपात दिली.
दरम्यान, आपल्याला समाजाकडून कळत न नकळत अनेक गोष्टी मिळत असतात. मग आपण देखील ह्या समाजच काहीतरी देण लागतो ह्या भावनेतून ही देणगी दिली आहे. सुखात सगळेच उभे राहतात परंतू अडचणीच्या काळात सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एक झाल पाहिजे ही शिकवण नेहमीच आई वडिलांनी दिली.ती जपण्याचा अल्पसा प्रयत्न असल्याचे दिनेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह वाबळे, रविंद्र महाडीक, नंदिनी वाबळे,उपसरपंच भगवान धावडे, ग्रापं सदस्य दिपक गाडे, पं. स. सदस्य जिजाबापू शिंदे, काळूराम ससाणे, बापु बर्डे, माणिकराव जाधव, राजाराम उंडे, भाऊसाहेब मांडे,संतोष गुंड, अमृलाल गुगळे, प्रतिभा उंडे, मुख्याध्यापक नवनाथ बोडखे, पर्यवेक्षक हौसराव दांगडे, संजय पानसरे, आशा कदम मॅडम, सुरसे सुमती, बोलणे लक्ष्मी, महेश शिंदे, दिघे, शंकर येलदोड तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.








