
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
धामणगाव : सरपंचपदाची सुत्रे माजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्याकडे?


वैराग : वैराग परिसरातील धामणगाव ( दुमाला ) ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत झाली असून सुरुवातीपासूनच ही ग्रामपंचायत चर्चेत राहीली. धामणगाव ( दुमाला) ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे आरक्षीत झाल्याने सरपंचपदाची माळ माजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता शिवाजीराव किसनराव पाटील ऊर्फ एस. के .पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे.11 फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम होत आहे. धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धामणगाव - दुमाला ग्रामपंचायती मध्ये आकरा ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. येथे शिवाजी पाटील व तानाजी पाटील गटाच्या ममताई ग्रामविकास आघाडीने सहा जागा पटकावत बहुमत सिद्ध केले. ह.भ.प. विवेकानंद बोधले महाराज यांच्या गटास तीन तर पांडूरंग पाटील गटास दोन जागेवर समाधान मानावे लागले. सोलापूर जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता म्हणून काम केलेले एस .के .पाटील हे 3O नोव्हेंबर 2O2O रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना ग्रामपंचायत विभागात असलेल्या विविध योजना व अभ्यास असल्याने धामणगावकरांनी त्यांच्या गटास बहुमत दिले. गावच्या सरपंच पदावर पहीले बांधकाम शाखा अभियंता होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्राधान्य देऊन जिल्हात एक मॉडेल गाव म्हणून गावाचा विकास कारभार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. वैराग भागात ग्रामपंचायत सरपंच पदावर निवडले जाणारे ते पहिले सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी शाखा अभियंता ठरणार आहेत. या निवडीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.








