top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
चंद्रपूर: 39 कोरोनामुक्त; 19 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू


चंद्रपूर: जिल्ह्यात मागील 24 तासात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 421 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 681 झाली आहे. सध्या 368 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 78 हजार 729 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 53 हजार 592 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपुर शहरातीन 78 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.


bottom of page






