
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
भरतकुमार मोरे, प्रशांत जोशी
यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर


सोलापूर : सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे आदर्श पत्रकार पुरस्कार दै पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, दै.संचार चे उपसंपादक प्रशांत जोशी यांना जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी २०२१ रोजी ११ वाजता पत्रमहर्षी कै. रंगा अण्णा सभागृह, पत्रकार भवन , विजापूर रोड येथे होणार आहे. जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह रजपूत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून कोरोना महामारीच्या काळात आपले योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सुध्दा " कोरोना योध्दा " म्हणून यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
पाच हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह ,शाल, बुके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या अगोदर संस्थेच्यावतीने अरुण बारसकर, युसूफ शेख , संजीव पाठक , मुबारक शेख , अभय दिवाणजी यांना "आदर्श पत्रकार" म्हणून सन्मानित करण्यात आले होते. पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लतीफ नल्लामंदू , अध्यक्ष अशोक मठपती , सचिव प्रा. पी. पी . कुलकर्णी यांनी केले आहे .








