
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
बीड जिल्ह्यात १३१ मतदान केंद्रांवर ६४ हजार ३४९ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

बीड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० साठी उद्या मंगळवार दि. ०१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील एकूण ६४३४९ मतदार १३१ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-२०२० ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात निवडणूक कालावधी पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करुन ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात सदर ठिकाणी १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान केंद्रावरील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत.
मतदानाच्या पूर्व तयारी करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक सूचना देऊन मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर वेब कास्टिंगद्वारे देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटॅसेझेशन) करुन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या मतदान प्रक्रियेतील मतदान केंद्रनिहाय अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य वितरण, करुन त्यांना मतदान केंद्राकडे पाठविण्यात येत आहेत. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदांना आवश्यक सुचना जारी केल्या आहेत.








