
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
तंबाखूमुक्त शाळा अभियानात नागोबाची वाडी प्राथमिक शाळा बार्शी तालुक्यात प्रथम


सोलापूर : भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील चतुर्थ व बार्शी तालूका मधून प्रथम तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक विवेकानंद जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक विश्वनाथ ढाणे यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान शाळेत राबविले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागोबाचीवाडी या शाळेने नवीन वर्षात ९ दिवसात ९ निकष पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक व बार्शी तालूक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात आली सलाम मुंबई फाऊंडेशन कडून डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त झाले. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी साधना काकडे , शिक्षण विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत जाधव, केंद्रप्रमुख धनाजी जाधव आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.








