
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
भुजंगासन

या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटाववरील वाढलेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते.
भुजंगासन कसे करावे ?
⬛ जमिनीवर पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. कोपरे कमरेला टेकलेले.
⬛ हनुवटी जमिनीवर टेकवावी.
⬛ आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा.
⬛ तुम्हाला जेवढे शक्य आहे तितकी आपली मान मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करावा.
⬛ वर आकाशाकडे पाहावे.आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे.
⬛ आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता.
भुजंगासनाचे फायदे :
⬛ पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
⬛ कंबर लवचिक होते.
⬛ गॅस ची समस्या दूर होते
⬛ शारीरिक व मानसिक ताण-तणावही हलका होतो.