
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 8 September 2025
.mahanewsonline.com
बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. बडिशोप मुखवास म्हणून जेवणानंतर खाल्ली जाते. परंतु बडीशेप (Fennel Seeds) किंवा सौंफमध्ये असे अनेक गुण आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. कारण बडीशोपमुळे फक्त एक नाहीतर अनेक समस्या दूर होतात.
चला तर मग जाणून घेऊयात बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...
◼️ खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.
◼️ जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.
◼️ बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
◼️ ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडीशेप मिक्स करून दूधातून प्यावं.
◼️ दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.
◼️ भाजलेली बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.
◼️ बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.
◼️ बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खालल्यास अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.
◼️ बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही वाढते.
◼️ दररोज बडीशेप खाल्ल्यास तुमची दृष्टी चांगली होते. डोळे निरोगी राहतात.
◼️ बडीशेप हा अॅसिडीटीवरील रामबाण उपाय आहे.
◼️ बडीशेप दिवसभर थोडी थोडी घेऊन चावून खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल.
◼️ हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यात तुम्ही खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल.
◼️ कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवण्यासाठी जेवणाआधी जवळजवळ 30 मिनिटं एक चमचा बडीशेप खावी.
◼️ जुलाब लागल्यास बडीशेप खाण्याने लगेच आराम मिळतो.
◼️ सुकी, भाजलेली आणि कच्ची बडीशेप समप्रमाणात मिक्स करा आणि रोज का. तुमची पचनक्रिया चांगली होईल.