
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
अर्धचक्रासन

सतत खुर्चीवर बसून काम करत राहिल्याने आणि पुढे झुकून काम करण्याच्या सवयीमुळे कंबरेचं दुखणं सतावतं. कंबरेत आलेला तणाव अर्धचक्रासनामुळे दूर करता येतो. म्हणून अर्धचक्रासनात आपण आपली कंबर थोडी मागच्या बाजूला झुकवतो. त्यामुळे कंबर अधिक लवचीक आणि मजबूत होते. या आसनामुळे मान, पाठ आणि कंबरेच्या स्नायूंना ताकद मिळते, लवचीकता येते.
अर्धचक्रासन कसे करावे ?
⬛ सर्वप्रथम दोन्ही पाय एकत्र ठेवून उभे राहावे.
⬛ हात शरीराजवळ असावेत. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समसमान असावे.
⬛ आता दोन्ही हात कंबरेच्या मागे घेऊन जाऊन हाताची बोटं एकमेकांत गुंफुन पकडून ठेवा.
⬛ छातीत श्वास भरुन हळूहळू कंबर थोडी मागच्या बाजूला वाकवा. डोकंही मागे न्या आणि त्याबरोबरच हातांना शरीरापासून थोडं दूर मागच्या बाजूला खेचा.
⬛ श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ आसनाच्या स्थितीत थांबा. मग हळूहळू कंबर आणि मान सरळ करा. गुंफलेले हात सोडा आणि पूर्वीच्या स्थितीत या. किमान दोन वेळा हे आसन करा.
अर्धचक्रासनाचे फायदे :
⬛ पोटातील चरबी कमी होते.
⬛ मानदुखी कमी होते.
⬛ पाठ दुखी व कंबर दुखी पासून आराम मिळतो.
⬛ शरीर मोकळे होते. हात आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात.