top of page

.... शिवसेना संपवायचे काम करत आहेत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने आज पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

ree

”नीतिमत्तेची चाड असेल, तर उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा घेतील. उद्धवजींना माझं आवाहन आहे की, आमचा विषय नाहीये. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. जर संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जातं आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येकवेळेला राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. वाझेंना निलंबित केले जाते तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? ” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.



“परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत. ते अतिशय निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट झालं आहे की, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावं. ” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

 
 
 

Comments


bottom of page