top of page

मनोहर जगताप यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

नाशिक- युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार तर्फे शक्ति विकास बहुउद्देशीय संस्थेस राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. याबद्दल २ सप्टेंबर रोजी शक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप व सचिव सौ मनीषा जगताप यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन नांदगाव खुर्द ( ता. मालेगाव) या मूळगावी सत्कार करण्यात आला.

ree

शक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप जगताप यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.



संस्थेने युवा सामाजिक विकास, शैक्षणिक,क्रीडा, पर्यावरण, आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे अशी माहिती गावातील माजी उपसरपंच नंदू जगताप यांनी दिली.याप्रसंगी गावातील शालेय समिती अध्यक्ष योगेश जगताप, उपाध्यक्ष श्याम गोसावी, सचिव निंबा बच्छाव ,माई चव्हाण, ग्रामपंचायत सद्स्य संजय गोसावी, माजी सरपंच नंदू जगताप, माजी सदस्य योगेश जगताप, भास्कर जगताप,जेष्ठ नागरिक हिरामण जगताप,दिलीप जगताप,माजी सैनिक संजय जगताप,गृहरक्षक अशोक जगताप, रविंद्र जगताप, जगन जगताप, दीपक जगताप किरण जगताप ,आदी युवक ,ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 
 
 

Comments


bottom of page