top of page

हमको तो बस तलाश नए रास्तो की है...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राज्यातील राजकीय चांगलवातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे भाजपाही आक्रमक झाली आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी शुभ प्रभात...म्हणत जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

ree

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी पत्र पाठवलं. या पत्रात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचा “हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है” असा शेर ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटमधून राऊत यांना नेमकं काय म्हणायचं? अशी चर्चा सुरू झाली आहे.

 
 
 

Comments


bottom of page