top of page

इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणं पडलं महागात; एकाचा मृत्यू

Sep 15, 2024
1 min read

इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. इडली जास्त प्रमाणात खाल्ल्याने एका 49 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली. बी सुरेश (आलमाराम , जि. पलक्कड) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो ट्रक चालक होता.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ओणम उत्सवानिमित्त इडली खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरेशने स्पर्धा जिंकण्याच्या नादात खूप जास्त इडली खाल्ल्या होत्या. इडली खात असताना त्याचा श्वास कोंडला गेला. आणि तो जमिनीवर पडला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घशात अडकलेली इडली काढायचा प्रयत्न केला. परंतु, सुरेशची तब्येत अधिक बिघडल्याने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.



 
 
 

Comments


bottom of page