top of page

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार

ree

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहे. दुपारी साडे चार वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लता दीदी यांच्या निधनामुळे मी शब्दांच्यापलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील.ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. असे ट्विट करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page