top of page

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. लतादीदींना यांना काही दिवसांपूर्वी मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे.


ree

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लतादीदींनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये गाणी गायली.

लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००९ मध्ये 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.१९७४ ते१९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये नोंदले गेले आहे.


 
 
 

Comments


bottom of page