top of page

जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


ree

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करताना कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचाच असल्याचा दावा ऋता आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी बुधवारी महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावर कारवाई केल्याने तसेच त्यांचे ऐकले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे महेश आहेर यांनी तक्रारीत म्हटले आहे.




 
 
 

Comments


bottom of page