top of page

पतीने घेतला पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा

पती-पत्नी यांच्यात बऱ्याचदा किरकोळ कारणावरून भांडण होताना दिसतात. काही जण घरातच भांडणं मिटवितात तर काहीजण थेट पोलीस स्टेशन गाठतात. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. स्वयंपाक नीट बनवला नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा घेतला. त्यामुळे पत्नीला जखम झाली आहे. सदर घटनेनंतर पत्नीने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय आरोपीने पत्नीला स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसंच मुलीलादेखील मारहाण केली. यावेळी त्याने मद्यपान केलं होतं. मारहाण करत असताना आरोपी पतीने रागाच्या भरात पाठीचा कडाडून चावा घेतला. ही घटना भोसरीमध्ये घडली. पती मद्यपान करून नेहमी पत्नीला मारहाण करत असे. मात्र पाठीचा कडाडून चावा घेतल्याने पत्नीची सहनशीलता संपली अन् पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बोलावून समज देऊन दोघांची भांडण मिटवली अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page