top of page

गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

जळगाव : गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार निंबाच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पळासखेडा (ता.भडगाव) जवळ हा अपघात झाला. किसन राठोड, पवन राठोड, जितेंद्र पवार अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.


पळासखेडा येथून होंडाई कारने किसन राठोड, पवन राठोड, जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे भरधाव वेगात जाताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाचा वेगाचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळल्याने कारमधील किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा), पवन इंदल राठोड (वय २६, रा. गाळण, ह. मु. टिटवाळा, ता. कल्याण), जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) या तिघांच्या डोक्यास व हातापायाला जबर मार लागला. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत सुनील वसंतराव राठोड (रा. गाळण, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

 
 
 

Comments


bottom of page