top of page

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने फोडलं महिलेचं नाक ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने एका महिलेच्या नाकावर ठोसा मारुन जखमी केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १०) बंगळुरुमध्ये घडला. त्यानंतर सदर महिलेनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर झोमॅटोने निवेदन प्रसिद्ध केलं असून संबंधित व्यक्तीला कामावरून काढण्यात आल्याची माहिती दिली. तसेच माफी मागत भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आश्वासन झोमॅटोने दिलं आहे.

ree

कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून नाकातून रक्त वाहताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हितेशा रक्तबंबाळ अवस्थेतील आपलं नाक दाखवत आहे. “माझी झोमॅटो डिलिव्हरी ऑर्डर उशिरा आली आणि मी कस्टमर केअरसोबत बोलत होते, यादरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं. त्याने मला मारहाण केली आणि इथे रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला,” असं हितेशा सांगत आहे.

सकाळपासून मी काम करत असल्याने झोमॅटोवरुन जेवण मागवलं होतं. मी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ऑर्डर दिली, जी साडे चार वाजेपर्यंत येणं अपेक्षित होतं. ऑर्डर वेळेत न आल्याने मी वारंवार फोन करत होती. एक तर मला मोफत द्या किंवा मग ऑर्डर रद्द करा असं मी कस्टमर केअरला सांगत होते”. “त्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉय आला. तो खूप उद्धट होता. मी दरवाजा पूर्णपणे न उघडता त्याला आपण कस्टमर केअरशी बोलत असल्याचं सांगितलं. ऑर्डर उशिरा आल्याने आपल्याला ती नको असल्याचं त्याला सांगितलं. यावेळी झालेल्या वादात डिलिव्हरी बॉयने नाकावर ठोसा मारुन पळ काढला,असं हितेशाने दुसऱ्या एका व्हिडीओत सांगितलं आहे.


Comments


bottom of page