top of page

राज्यात 3 ते 31 मे पर्यंत अनुभवता येणार शून्य सावली दिवस; जाणून घ्या तुमच्या शहरातील तारीख व वेळ

मुंबई : आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही. पण निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडींमुळे सावलीही आपली साथ सोडू शकते, याचा अनुभव आपल्याला मे महिन्यात घेता येणार आहे. 3 मे पासून 31 मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

ree

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत तर मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी 15 मे पासून 28 जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी प्रत्येक शहरासाठी विविध दिवशी आणि वेळी शून्य सावली अनुभवता येणार आहे.


तुम्ही https://alokm.com/zsd.html या लिंकवर क्लिक करुनही तुमच्या शहरातील शून्य सावली दिवसाबाबत माहिती करुन घेऊ शकता. या लिंकवर गेल्यावर तुम्हाला घरबसल्या तुमच्या शहरातील शून्य सावली दिवस आणि वेळ याची माहिती मिळू शकते.

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.


 
 
 

Comments


bottom of page