top of page

युवराज सिंगला हरियाणामध्ये अटक

काही तासांच्या चौकशीनंतर सुटका

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग.याला हिसार ( हरियाणा ) पोलिसांनी अटक केली आहे. हांसी शहर पोलीस स्टेशनमध्ये युवराज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागच्या वर्षी रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटवेळी युवराजने युझवेंद्र चहलवर अनुसुचित जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केलं, असा आरोप आहे. हांसी पोलिसांनी शनिवार, १६ऑक्टोबरला युवराज सिंगला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटकपूर्व जामीन पत्रांच्या आधारे सोडण्यात आले.

ree

अटकेनंतर हिसार जिओ मेसमध्ये युवराज सिंगची चौकशी करण्यात आली. यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामिनाचे आदेश दिले होते. यामुळे, हांसी पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली, त्याच्याकडून काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटकपूर्व जामीन पत्रांच्या आधारे सोडण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.



 
 
 

Comments


bottom of page