top of page

एसटी आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

एसटी बस आणि कारचा भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, रविवारी (४ डिसेंबर) सकाळी १०.३० च्या सुमारास यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राधेश्याम इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) या चौघांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ree

जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता त्यांना नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page