top of page

WPL Auction : पाकिस्तानविरुद्धच्या खेळीने ऋचाला मिळाली मोठी रक्कम

महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेसाठी सोमवारी मुंबई येथे खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात अनेक भारतीय महिला खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली आहे. भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिला सोमवारी झालेल्या या लिलावात लॉटरी लागली आहे. यष्टीरक्षक ऋचा घोषसाठी आरसीबीने कोट्यवधी रुपये मोजले.

रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋचा घोषवर सर्व फ्रेंचायझींचं लक्ष होतं. पाकिस्तानविरुद्धच्या खेळीने तिची किंमत वधारली. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात तिच्यावर अनेक फ्रेंचायझींनी बोली लावली. अखेर १.९० कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ऋचाला आपल्या संघात सामील करून घेतलं.


 
 
 

Comments


bottom of page