top of page

VIDEO : नियम शिथिल होताच दारुच्या दुकानासमोरच ... ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता सरकारने तेथे दारूची दुकाने खुली करण्याचीही परवानगी दिली असून सोमवारपासून दारूची दुकाने खुले करण्यात आले आहे. दारूची दुकाने खुली झाल्याने तळीरामांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

ree

दुकानांमध्ये मोठी रांग पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमध्ये येथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, पण एका व्यक्तीने हा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा चक्क भररस्त्यात दारुची पूजा केली आहे. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एएनआयने या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमधील एक व्यक्ती दारूची दुकानं खुली झाल्यामुळे इतका आनंदी झाला आहे की, त्याने चक्क दारूच्या दुकानाबाहेर दिवाच लावला. त्यानंतर काऊंटरवर जाऊन दोन बाटल्या खरेदी केल्या आणि अग्नी देवतेला दाखवला आणि नमस्कार केला. आणि दारूचा आस्वाद घेतला. हे पाहून दुसरी व्यक्तीदेखील त्याच्या मागून आली आणि ती देखील पुजेत सहभागी झाली.

तामिळनाडूमध्ये 25 दिवसांनंतर 14 जून रोजी 27 जिल्ह्यांमध्ये सलून, पार्क आणि सरकारी दारूची दुकाने पुन्हा खुली करण्यात आली आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी अशी शिथिलता जाहीर केली होती. तसेच, 21 जूनच्या सकाळपर्यंत काही निर्बंध वाढवले होते. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळी तेथील नागरिकांना जाता येणार नाही. तसेच सार्वजनिक वाहतून व्यवस्थाही बंद असणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page