top of page

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

केंद्र सरकारच्या सोशल मीडिया संदर्भातील नव्या नियमावलीविरोधात इन्स्टंट मेसेजिंग अँप व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला देत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवीन नियमांनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन अत्यावश्यक काम लागू होईल. अ‍ॅपवर विशिष्ट संदेश कोठून आला हे व्हॉट्सअ‍ॅपला सांगावे लागेल.

ree

नवीन नियमांनुसार, केंद्र सरकारला आता कोणाच्याही व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट ट्रेस करता येणार आहे. त्यामुळे आपल्या यूजर्सची 'राईट टू प्रायव्हसी' धोक्यात येणार आहे असं व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.


केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करणं ही कंपनीची जबाबदारी आहे. पण काही नियमांबाबत सरकारशी विस्तृत चर्चा होणं अपेक्षित आहे, असं फेसबुकनं म्हटलं.


 
 
 

Comments


bottom of page