top of page

... तर आमचे लग्न नक्कीच मोडेल

घरून काम (Work from Hom) करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पत्नीनं लिहिलं पत्र

ree

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा ऑनलाईन तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही कमी करण्यांत आली आहे. तर काही कंपन्यांचे काम वर्क फ्रॉम होम (घरून) चालत आहे. असंच ऑफिसचे काम घरातून (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीबद्दल तक्रार करत वर्क फ्रॉम होम ऐवजी कार्यालयातून काम सुरू करावे, असे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्याच्या पत्नीचं हे पत्र उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अलीकडेच ट्विटरवर शेअर केलं आहे. गोयंका यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

पत्नीने पत्रात काय म्हंटले आहे ?

'महोदय, मी तुमचा कर्मचारी मनोजची पत्नी आहे. त्यांना आता कार्यालयातून काम करण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन करत आहे. माझ्या पतीला कोविड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि ते कार्यालयातील सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करतील. जर घरून काम (वर्क फ्रॉम होम) अजून काही काळ असेच चालू राहिले तर आमचे लग्न नक्कीच मोडेल. तो दिवसातून दहा वेळा कॉफी पितो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसतो आणि तिथे गडबड करतो, सतत काहीतरी खाण्यासाठी मागत असतो. मी त्याला कामादरम्यान झोपलेले देखील पाहिले आहे. मला आधीच दोन मुलांची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.

हर्ष गोएंका यांनी हे पत्र शेअर करताना 'यांना कसे उत्तर द्यायचे ते मला माहीत नाही...'. असे कॅप्शनमध्ये लिहिलंय. या पोस्टला अनेकांनी लाइक्स केले असून कमेंट्सही केल्या आहेत.


 
 
 

Comments


bottom of page