top of page

पाण्याच्या बॉटलने केला घात; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते, याची प्रचिती देणारी घटना नोएडा-ग्रेटर नोएडाच्या एक्स्प्रेस वेवर घडली आहे. कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे एका इंजिनिअरला जीव गमवावा लागला आहे.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर अभिषेक झा (रा. दिल्ली) ग्रेटर नोएडाच्या एका कंपनीमध्ये नोकरीला होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होते. यावेळी सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बॉटल सरकत अभिषेकच्या पायाखाली आली. ट्रक जवळ आल्याने त्याने कार थांबविण्यासाठी ब्रेक लावला, मात्र, ब्रेक पॅडलच्या खाली पाण्याची बॉटल आल्याने ब्रेक लागू शकला नाही आणि त्यांची कार रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात अभिषेक यांचा मृत्यू झाला तर मित्र गंभीर जखमी झाला आहे.


 
 
 

Comments


bottom of page