top of page

कोविड रुग्णांना व नातेवाईकांना करता येईल तक्रार

रुग्णालयाच्या सेवेबाबत गुगल फॉर्मच्या माध्यमातून तक्रार करण्याचे आवाहन

ree

वर्धा : कोविड रुग्णांना रुग्णालयात उपचार घेताना रुग्णालय सेवेबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणी निर्माण होतात. यासाठी कुठे तक्रार करावी असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी जिल्हा प्रशासनाने तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी गुगल फॉर्मच्या माध्यामातून तक्रार सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfcllwb2B-__t072UvsiK9LH_H1xCxIifgGpTSnpDmM3GflPg/viewform?usp=sf_link या लिंक वर क्लिक करून नागरिकांना सविस्तर तक्रार करता येऊ शकते. तसेच या 9420860850 व्हाट्स अँप क्रमांकावर सुद्धा तक्रार करता येईल.


रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय कर्मचारी यांचा प्रतिसाद, डाक्टरांची व्हिजिट, डॉक्टरांची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, रुग्णांना बाहेरून औषधी आणायला सांगणे, रुग्णलयाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणे,रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती देणे, रुग्णालयातील स्वछता इत्यादी बाबींबद्दल रुग्णांना आता गुगल फॉर्मच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. नागरिकांनी या माध्यमातून तक्रार नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


 
 
 

Comments


bottom of page