top of page

तिहेरी हत्याकांड; भाडेकरुच निघाला मारेकरी

नेहरोली (ता. वाडा, जि. पालघर ) येथील एका घरात तिघांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली होती. या तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले असून आरोपी हा त्यांचाच भाडेकरु असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद बेचलदास राठोड हे त्यांच्या पत्नी व मुलीसह वाडा तालुक्यातील नेहरोली येथील बोंद्रे आळी येथे राहत होते. तर, त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. आई वडिलांशी आठ दिवसांपासून काहीच संपर्क न झाल्याने त्यांचा मुलगा सुहास शुक्रवारी दुपारी नेहरोली येथे आला. मात्र, घराला कुलुप पाहून त्याने इतरत्र चौकशी करण्यास सुरुवात केली. पण काहीच माहिती मिळाली नाही.अखेर घराचे कुलूप तोडून सुहास घरात गेला. मात्र, घरात शिरताच त्याला दुर्गंधी आली. घरात तिघांचे मृतदेह दिसल्याने त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घराची छाडाछडती घेताच घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नंतर ही हत्याच असल्याचे समोर आले.



Yorumlar


bottom of page